Mitramandal Bengaluru

Click here to edit subtitle

Book Reviews (निवडक  पुस्तकांचा सारांश)

सदरातील सर्व सारांश लिखाणाबद्दल सौ. मथुरेंना धन्यवाद.

1. U.S. & us : यु एस अॅंड अस

अमेरिकन जीवनाशी जुळवून घेताना भारतीय माणसांना जो त्रास होतो तो त्रास "यूएस अँड अस' या कथासंग्रहातील कथांमधून समोर येतो. खरे तर त्रास हा मामुली शब्द आहे. आजपर्यंतच्या गृहितकांना छेद देणारे प्रसंग या कथांमधील पात्रांवर कोसळतात. मात्र अमेरिकन नागरिक व तेथे राहणाऱ्या भारतीय मंडळींच्या दुसऱ्या पिढीच्या दृष्टीने या गोष्टी किरकोळ किंवा थोडाफार त्रास अशा सदरात मोडतात, ही विसंगती खूपच क्‍लेशदायक आणि पहिल्या पिढीला व्यथित करणारी आहे. 


यातील कथांमधून लेखक विकास देशमुख तेथे ससेहोलपट झालेल्या मंडळींची वेदना नेमकी या कथांमधून पोचवतात. आयुष्याचा उत्तरार्ध अचानकपणे अमेरिकेत घालवायची वेळ आल्यावर कशी हतबलता येते, तसेच इच्छा असूनही काही करता येत नाही, अशी अवस्था यातील कथांमधील नायक अथवा नायिकांची आहे. अर्थात रूढ अर्थाने त्यांना नायक आणि नायिका म्हणायचे. प्रत्येक कथेत नायक किंवा खलनायक आहे ती अमेरिकन संस्कृती, तिथले नियम, कायदे आणि समाजव्यवस्थाच.


Author: विकास देशमुख

2. Rumali Rahasya : रुमाली रहस्य

रुमाली रहस्य'चं कथानक अठराव्या शतकातल्या पुण्यात घडतं. मराठेशाही, नाना फडणवीस - घाशीराम कोतवाल - रामशास्त्री प्रभुणे यांच्या परिसर आणि सामाजिक - राजकीय पर्यावरणात घडणारी ही कादंबरिका गेली पंचेचाळीस वर्षे उपलब्धच नव्हती. मृण्मयी प्रकाशनाने ती नुकतीच पुनर्मुद्रित केली आहे.


Authors: श्री. गो. नी. दाण्डेकर 

3. Ha Tel Navacha Itihas Aahe: हा तेल नावाचा इतिहास आहे

अमेरिकेची दादागिरी, इस्लामी दहशतवाद, इजिप्त व इराणवरचे हल्लेए, सद्दाम हुसेनच्या मुसक्या बांधणं, पहिलं आणि दुसरं महायुद्ध, भारताला अणुइंधन पुरवण्याची अमेरिकेची तयारी आणि भारताच्या पेट्रोलियम मंत्रीपदावरून मणिशंकर अय्यर यांना दूर करणं, या सर्व लहानमोठ्या घडामोडींना तेलच कसं कारणीभूत आहे, हे समजून घेण्यासाठी 'हा तेल नावाचा इतिहास आहे!...' हे पुस्तक वाचायलाच हवं.


Author: गिरीश कुबेर

4. Shivaji Maharaj The Greatest: शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट 

5. Amchya Ayushyatil Kahi Athavani : आमच्या आयुष्यातील काही आठवणी

जागतिक योद्धे आणि शिवाजी महाराज


महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या शिवछत्रपतींचे इतिहासातील वेगळे स्थान सांगण्याचा प्रयत्न शिवाजी महाराज -द ग्रेटेस्ट या ग्रंथात डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी केले आहे. या ग्रंथात जगभरात घडलेल्या महान घटना आणि त्यामागे असलेल्या महान राजे, योद्धे, जगज्जेते यांच्याशी शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली आहे अथवा अशा व्यक्तींच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. ते करताना श्रीशिवछत्रपतींच्या जीवनातील विविध घटनांचा परामर्श जगभरात घडलेल्या महान घटनांच्या संदर्भात घेतला आहे. यात अकबर आणि औरंगजेब या दोन एतद्देशीय राजयोद्धांशी तसेच अलेक्झांडर, सीझर, हानीबाल, ऍटिला, रिचर्ड द लायन हार्ट, विलियम वॉल्स, ऍडॉल्फस गस्टावस, चिंगीज खान या परदेशी योद्धांशी वा त्यांच्या युद्धतंत्र - डावपेचांशी शिवाजी राजांची आणि त्यांच्या युद्धतंत्राशी तुलना करण्यात आली आहे. 


Author: हेमंतराजे गायकवाड

रमाबाई रानडे' म्हणजेच न्यायमूर्ती रानडे यांच्या ज्या फक्त पत्नीच नव्हत्या तर ज्या त्यांच्या छाया होत्या, अशा एका महाराष्ट्रीय स्त्रीने स्वतंत्रपणे लिहिलेलं पहिलेच असं आत्मचरित्र म्हणजेच 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' रमाबाई रानडे ह्यांचे व्यक्तिमत्व किती प्रभावी होते ते हे आत्मचरित्र वाचताना लक्षात येते. वेळोवेळी घडलेल्या गोष्टी व झालेली संभाषणे काही सहज तर, काही विशेष कारणांनी ध्यानात राहिली ती आठवली तशी सध्याचे स्थितीत अंत:करणाचे सांत्वन करण्यासाठी व जो श्रेष्ठतम सहवास जो आता प्रत्यक्ष राहिला नाही; त्याचा मानसिक रीतीने अनुभव घेण्यासाठी वहिनीबाईंनी कागदावर मांडली व आता ती वाचकांस सादर केली आहेत.अनुपमेय भक्ती व निस्सीम प्रेम या भावांनी या 'आठवणी' लिहिल्या आहेत.

6. Hitler : हिटलर

या आक्रमक नेत्रृत्वाने अवघ्या सहा वर्षांत जखमी जर्मन गरुडाच्या रक्तबंबाळ पंखात पुन्हा आभाळझेप घेण्याइतके सामर्थ्य ओतले. बृहद्जर्मनीचे संस्थापन आणि ज्यू धर्मीयांचे निर्दालन हे या नेत्रृत्वाने निर्माण केलेले दाहक रसायन. चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टॅलिन या तीन मातबर प्रतिस्पर्ध्यांशी त्याने झुंज घेतली. सारे जग विरुद्ध एकटा हिटलर असा हा सामना होता. १९३३ त१ १९४३ ही दहा वर्षे हिटलरची होती - एकट्या हिटलरची. युरोपमधल्या महासत्तासुद्धा त्याच्या भेदक नजरेच्या धाकात वावरत होत्या. त्यातून त्याला आदर आणि विस्मय, भय आणि संताप या परस्परभिन्न पण प्रखर प्रतिक्रियांचा स्वीकार करावा लागला. सिकंदर आणि नेपोलियन या समशेरबहाद्दर सम्राटांचा पराक्रम हिटलरने फिका ठरवला. विसाव्या शतकाने अनुभवलेल्या या विनाशक वादळाची ही चरितकहाणी.

7. Poladi Purush Sardar Patel : पोलादि पुरुष सरदर पटेल

8. Gangavtaran : गंगावतरण

वल्लभभाई पटेल यांनी स्वत:ला कोणताही पुरस्कार लाभावा म्हणून अप्रत्यक्षपणेदेखील प्रयत्न केले नाहीत. इतरांना एकादा मान्यवर पुरस्कार लाभला म्हणून कधी गळाही काढला नाही. भारताच्या भल्यासाठी एका बाजूने पंडित जवाहरलाल नेहरू गोड गोड नाती जोडत होते, तर त्याच भारताच्या अस्मितेसाठी वल्लभभाई पटेल स्वत:च्या पदरात कडवटपणा घेण्यावेळी कचरत नव्हते. बारडोलीचे आंदोलन(१९२८ -२९) यशस्वी झाल्यानंतर ते एकमुखाने "सरदार' या अभिमानाने ओळखले गेले. त्या वेळी त्यांना स्वत:च्या खांद्यावरल्या उत्तरदायित्वाची प्रकर्षाने जाणीव झाली.


सरदार पटेल यांनी भारताच्या बाहेरही स्वत:ची नाममुद्रा उमटवली पाहिजे, असे मानणार्‍यांत इंग्लंडचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिलदेखील होते. देशाची सेवा किती सचोटीने करता येते, हे सरदार पटेलांितके कोणाला जमेल असे मला वाटत नाही, अशी स्वच्छ कबुली लॉर्ड माउंटबेटन यांनी दिली होती.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगल यांचं भारतीय अभिजात संगीतक्षेत्रातील योगदान खूप मोठं आहे. "गंगावतरण' या पुस्तकातून गंगूबाईंचं व्यक्तिमत्त्व; वाचकांसमोर उलगडत जातं. पहिल्याच प्रकरणातील म्हणजे "गंगावतरणाच्या आधी' यात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते आधुनिक काळापर्यंत कर्नाटकाच्या भौगोलिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील काही घटनांचा आढावा घेण्यात आला आहे; तसेच सोबत संदर्भही नमूद आहेत. संगीतप्रेमी, जाणकार आणि नव्यानं संगीत शिकणाऱ्यांना यामुळे उपयुक्त माहितीचा खजिनाच मिळतो.


Author: दमयंती नरेगल 

9. Ani Don Hat : अाणि दोन हात

10. Anandi Gopal : अानंदी गोपाळ

डॉ. श्रीखंडे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शल्यचिकित्सक यांनी वैद्यकीय सेवेत आलेल्या विलक्षण अनुभवांचे कथन केले आहे. शस्त्रक्रिया किती केल्या यापेक्षा किती टाळल्या याला ते महत्त्व देतात.

वाचेतील जन्मजात दोष, त्यामुळे भाषांविषयी भीती, गणितातली आकडेमोड आणि इतिहासातल्या सनावळया डोक्यात न शिरणार्‍या अशा परिस्थितीतल्या एका सर्वसामान्य भासणार्‍या मुलाच्या जमेच्या बाजू होत्या, वारसा हक्काने मिळालेला स्वभावातला कनवाळूपणा, कष्ट करण्याची जिद्द आणि दोन हात ... वेगवेगळया खेळांत आणि कलांमध्ये अतिशय कुशलतेने चालणारे! या गुणांच्या जोरावरच स्वत:मधल्या कमतरतांवर मात करून या सर्वसामान्य मुलाने घेतलेल्या गरुडभरारीची ही कथा. 


आजवर वैद्यकीय क्षेत्रापुरतेच मर्यादित असलेले डॉक्टरांचे विचार या पुस्तकाच्या रूपाने सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. स्वत:ची बलस्थाने ओळखून जिद्द, संयमी वृत्ती, परिश्रम, नीतिमत्तेची कास यांच्या आधारावर सामान्य समजला जाणाराही असामान्य कार्य करू शकतो याचा आदर्श हया आत्मनिवेदनात सापडेल.


Author: डॉ. श्रीखंडे 

एकदां उंबरठ्यावरचें माप कलंडून आंत गेल्यावर, ज्या काळीं स्त्रियांनी उंबरठ्याबाहेर डोकावून पाहणेंहि मुष्कील असे, अशा काळांत कादंबरीकार श्री. ज. जोशी आपल्याला घेऊन जात आहेत. अनेकार्थांनी क्रांतिकारी अशा, गेल्या शतकाच्या उत्तरार्धांतील एका कालखंडाच्या या कहाणीचे सूत्रधार गोपाळराव जोशी. कांहींसे निष्ठुर, एककल्ली, चक्रम आणि व्रात्य. परंतु त्याचबरोबर आपली दुसरेपणाची तरुण बायको आनंदी हिने शिकून जग गाजवावें या भव्य कल्पनेने झपाटलेले.


सातासमुद्रापलीकडे एकट्याने प्रवास करून आनंदीबाईंनी डॉक्टरीची पदवी मिळविली; परंतु शारीरिक व मानसिक हालअपेष्टा सहन करून अमेरिकेंत वैद्यकाची संजीवनी विद्या मिळवित असतांनाच प्राणघातक रोगाचें बीज त्यांच्या देहात रुजले. त्यानेच डॉक्टरीणबाईंचा बळी घेतला.


श्री. जं. च्या सदाशिव पेठी लेखणीने आपल्या कादंबरीच्या नायक-नायिकेच्या तोडीच्या जिद्दीनें भरारी मारून तत्कालीन अमेरिकेचे वातावरणहि आपल्या डोळ्यांपुढे हुबेहूब उभें केलेलें आहे. ज्या ब्राह्मणी संस्कृतीत लेखकाची पाळेंमुळें खोलवर गेलेली आहेत, तिच्याबद्दल अत:स्फूर्त समज तर आनंदी गोपाळच्या पानापानांत आहेच; पण त्यालाच प्रचलित समाजस्थितीचा व आनंदी गोपाळच्या चरित्राचा दीर्घ व्यासंग, अतिशय रसाळ अशी निवेदनशैली, आणि कथाविषयाचा वेगळेपणा अन त्यांत ओतप्रोत भरून राहिलेलें नाट्य यांचीही जोड मिळालेली आहे.


Author: श्री. ज. जोशी