top of page

नाटक दादा एक गुड न्यूज आहे

मित्रमंडळ बंगळुरु नेहमीच आपल्यासाठी दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येत आले आहे. याची सुरुवात नूतन वर्ष तसेच संक्रांत सणाचं औचित्य साधून जानेवारी मध्ये केली जाते.

 

परंतू यंदा महाराष्ट्र मंडळाच्या "शताब्दी जल्लोष" या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंडळाने दिलेल्या मदतीच्या हाकेला मित्रमंडळ बंगळुरू ने मैत्रीपूर्ण साद दिली आहे. म्हणूनच या वर्षी जानेवारीमध्ये होणारा कार्यक्रम हा थोडासा उशिरा होत आहे. तरीही नाराजी नसावी कारण आपल्या मनोरंजनात आम्ही कसर पडू देणार नाही.

 

नूतन वर्ष आणि संक्रांत विशेष कार्यक्रम घेऊन आम्ही फेब्रुवारी मध्ये तुमच्या भेटीला येत आहोत. परीक्षांची चिंता, कामाचा व्याप या सगळ्यातून थोडा विरंगुळा हवाच ना. म्हणूनच एक दिवस काही तास आपल्या स्वतःसाठी राखून ठेवा आणि मनोरंजनाच्या मेजवनीचा आस्वाद घ्या.

 

मित्रमंडळ बंगळुरू खास आपल्यासाठी घेऊन येत आहे ताज तवानं, हलकं फुलकं नाटक "दादा एक गुड न्यूज आहे."

 

दि. १६ फेब्रुवारी २०१९ रविवार

वेळ - सकाळी १० वाजता
स्थळ - मेजर उन्नीकृष्णन ऑडिटोरियम, न्यू होरायझन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आउटर रिंग रोड, बंगळुरू.

bottom of page