top of page

आमच्या बद्दल थोडेसे ...

labhale amhas bhagya.jpg
मराठी मातीपासून दूर बंगळुरू नगरीत आलं की सगळ्यांनाच आठवण येऊ लागते ती वडा पाव, पुरणपोळी, लावणी, पोवाडा, नाटक अशा जीवाभावाच्या गोष्टींची! अशा वेळी मराठी मित्रांना एकमेकांना भेटायला, गप्पा मारायला, सण साजरे करायला, सांस्कृतिक कार्यक्रम ही साजरे करायला, पुस्तक वाचायला आणि प्रसंगी मदत ही करायला उपलब्ध असणारे  व्यासपीठ म्हणजे मित्रमंडळ!
मित्रमंडळ ही बंगलोर मधील सुपरिचित व लोकप्रिय संस्था. गेल्या जवळजवळ पस्तीस वर्षांपासून महाराष्ट्रापासून दूर मराठी संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम मित्रमंडळ सातत्याने करीत आहे. दरवर्षी पाच दिवसांचा गणेशोत्सव, कोजागिरी, शिवजयंती,  छोटीशी सहल, आनंद मेळा आणि किमान दोन महाराष्ट्रातील गाजलेल्या कलाकारांचे प्रोफेशनल कार्यक्रम मित्रमंडळ बंगळुरात सादर करते. 
दर वर्षी गणेशोत्सवात स्मरणिका प्रसिद्ध होते. दर महिन्याला इ-मासिक कट्टा विविध कलाकृतींना व्यासपीठ  उपलब्ध करून देते.  वाचनालय बंगळुरूच्या विविध भागांत  सुरु आहे. 
मित्रमंडळाचे वार्षिक अथवा आजीव सदस्य होऊन  आपलं मराठी संस्कृतीशी नातं जिवंत ठेवू या.

मित्रमंडळाशी नातं जोडूया
मैत्रीची वीण घट्ट विणूया 

जवळचा की लांबचा 
मित्रांमध्ये मित्र, मित्रमंडळाचा 

बंगलोरातला सवंगडी
मित्रमंडळाचा मराठी गडी!!
bottom of page