top of page

गणेशोत्सव २०१८

दर वर्षी मित्रमंडळ  पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करते. यांत  बंगळुरू मधील कलाकारांचे नृत्य, नाट्य, संगीत असे कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम व महाराष्ट्रातून बोलाविलेल्या प्रतिथयश कलाकारांचा कार्यक्रम यांचा समावेश असतो. 
२०१८ चा गणेशोत्सव नेहेमीप्रमाणेच यंदाही सदाबहार करमणुकींचे कार्यक्रम घेऊन आला. महाराष्ट्र मंडळाने या वर्षी बंगलोरला असलेल्या विविध भागातील मराठी मंडळांना वेगवेगळे एक दशक दिले होते व त्या दशकात घडलेल्या घटनांचा आढावा घेणारा एक तासाभराचा कार्यक्रम सादर करण्यास सांगितले होते. मित्रमंडळ इंदिरानगरला १९७० ते १९८० हे दशक मिळाले.  राजकारण, क्रीडा, विज्ञान, कला, रंगभूमी, संगीत, नाट्यभूमी, साहित्य ह्या सर्व क्षेत्रांचा आढावा, audio visuals ची साथ, सर्वच्या सर्व १६ कलाकारांचे उत्तम co-ordination, perfect एन्ट्री व exit, सुस्वर संगीत, नृत्य, विनोदी चुटके, दिग्दर्शनातील बारकावे यामुळे कॅलिडिओस्कोप सर्वांच्या मनात अगदी घर करून गेला आणि अर्थातच पहिल्या बक्षिसाचा मानकरीही ठरला.
मित्रमंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१८ ला एक आगळा वेगळा नृत्याविष्कार बघण्याचा योग आला. रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली मध्ये लिहिलेले ‘चित्रांगदा’ हे काव्य ‘गंधर्व कला केंद्र’च्या संस्थापिका अर्चना बक्षी यांना बरेच दिवस खुणावत होते. त्याचे मराठीत संस्करण करून, त्यावर गाणी, नृत्य याची अंगड टोपडी घालून गेले सहा महिने त्यावर अथपासून इतिपर्यंत मेहेनत घेऊन ही नृत्यनाटिका त्यांनी साकार केली. 
गेली बरीच वर्ष मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात चित्रपट संगीताचा प्रवास, रागांवर आधारित गाणी असे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करणाऱ्या स्वरनाद ने या भक्तिगीते अशी साधी सोपी थीम निवडली खरी पण हे शिवधनुष्य उचलणे काही सोपे नव्हते. मराठी, हिंदी सह  वेगवेगळ्या भाषेतील गीते, संत मीराबाई पासून तुकारामांपर्यंत अनेक संतांनी रचलेली अनेक गीते सादर करून अत्यंत अप्रतिम असा कार्यक्रम स्वर नाद ने सादर केला. 
या वर्षी प्रमुख पाहुण्या होत्या प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी. स्मरणिकेचे प्रकाशन, त्यांची मुलाखत, लहान मुलांचे कार्यक्रम, श्री. आनंद वैशंपायन यांचा बासरी वादनाचा कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांनी गणेशोत्सवाची शोभा वाढविली. 
bottom of page