मित्रमंडळ बेंगळुरू
ಮಿತ್ರಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು
मित्रमंडळाचे कार्यक्रम
मधुरव - बोरू ते ब्लॉग
शरदचांदणे पसरे भूवरी
ताल टिपरीचा घुमतो अंबरी
दुग्ध केशरी स्वाद जिभेवरी
करु साजरी ही कोजागिरी ||
मित्रमंडळाचे कार्यक्रम
प्रभात ते सैराट
मित्रमंडळ गेली अनेक वर्षे सातत्याने मराठी संस्कृतीशी नाते जोडून ठेवणारे विविध कार्यक्रम करत असते. यात साधारणतः दोन महाराष्ट्रात गाजत असलेले कार्यक्रम असतात. नाटक, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, एकपात्री प्रयोग अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचा त्यात समावेश असतो.
यासोबतच बंगळुरू मधील लोकल कलावंतांचे कार्यक्रम ही दरवर्षी होत असतात. स्वर नाद हा मित्रमंडळातील सदस्यांनी एकत्र येऊन चालवलेला संगीत प्रेमी गायक वादक कलाकारांचा ग्रुप दर वर्षी मित्रमंडळात व मित्रमंडळातर्फे इतर ठिकाणीही गाण्याचा कार्यक्रम सादर करतो. या शिवाय बालदिन, शिवजयंती यांचे निमित्त साधून स्पर्धा, रक्तदान शिबीर असे उपक्रम योजले जातात. गेली दोन वर्षे गणेशोत्सवात गंधर्व कला केंद्राच्या वतीने नृत्यनाट्य ही सादर होत आहे.
अशा सर्व कार्यक्रमांमध्ये व स्पर्धांमध्ये भाग घेण्यास आपले स्वागत आहे.
मित्रमंडळाच्या सदस्यांना सर्व कार्यक्रमाची माहिती ई-मेल, व्हाटस अँप, फेसबुक व इतर माध्यमांतून कळवली जाते.