मित्रमंडळ बेंगळुरू
ಮಿತ್ರಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು
स्पर्धा - धमाल कुटुंबाची
नमस्कार मंडळी,
गेले ४ महिने आपण कोरोनाशी लढतो आहोत त्यासाठी सर्व नियम पाळत आहोत,घरीच आहोत. तरीही कुठे ना कुठे आळस कंटाळा हे सुद्धा आपल्यासोबत च राहत होते. पण आता वेळ आली आहे त्यांना हाकलून लावायची आणि आपल्या कुटुंबियां सोबत धमाल मस्ती करण्याची.
म्हणूनच मित्रमंडळ बंगळुरू आपल्यासाठी घेऊन आले आहे "धमाल कुटुंबाची" ही स्पर्धा. या स्पर्धेचे ३ भाग असतील ते पुढीलप्रमाणे-
१. फॅमिली सेल्फी
( किती तरी दिवस झाले छान तयार होऊन,फोटो काढून. हो ना??? मग आता छान छान तयार व्हा आणि पूर्ण कुटुंबाचा सुंदर सेल्फी काढून पाठवा )
२. राखी बनवणे
( सध्या सगळेच सण आपण घरात बसूनच साजरे करतोय तर रखीपौर्णिमाही करू. तर चला बनवा घरच्या घरी राखी )
३. मैत्री कुटुंबाची
( या लोकडाऊन च्या काळात कुटुंब म्हणूनच सगळेच आणखी जवळ आले आहेत आणि त्यांच्यातील मैत्री ही दृढ होत आहे तर मग मैत्री दिनाचं औचित्य साधून व्यक्त व्हा आणि लिहा )