top of page

नमस्कार मंडळी,
आपण प्रत्येक जण सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत असतो. बरेच जण आपले विचार, त्यावरील अभ्यास आपल्या लेखणीतून उतरवतात पण तरी कुठेतरी काहीतरी कमी पडतं. बऱ्याच जणांना मनातलं कागदावर उतरवायचं असतं पण शब्द साथ देत नाहीत.
हे सगळ काही शक्य आहे फक्त त्यासाठी जाणून घ्यायला हवं ते म्हणजे लिखणामागचं तंत्र आणि शास्त्र.

याच साठी मित्रमंडळ बेंगळुरू आपल्यासाठी आयोजित करत आहे "लिहू आनंदे - लेखन कार्यशाळा" आणि यासाठी मार्गदर्शन लाभणार आहे, लेखन, समीक्षा, संपादन, अध्यापन, कथालेखन, ललित लेखन, सूत्रसंचालन, अभिवाचन अशी साहित्याची अनेक रूपं रसिकांसमोर पेश करणाऱ्या डॉ. वंदना बोकील - कुलकर्णी.

चला तर मग छंद म्हणून असो की व्यावसायिक दृष्टिकोन असो, आता शिकूया लेखनाचे तंत्र आणि मंत्र.

bottom of page