top of page

मित्रमंडळ बेंगळुरू २०२४ 

 

नमस्कार मंडळी,

मित्रमंडळ बेंगळुरू घेऊन येत आहे एक आगळा वेगळा आणि अभ्यासपूर्वक सादर होणारा, कार्यक्रम "मधुरव - बोरू ते ब्लॉग".

दिनांक ३० जुन २०२४ रोजी सकाळी १० वाजता इंदिरानगर संगीत सभा इथे हा कार्यक्रम होणार आहे.

मधुरा वेलणकर साटम सांगत आहेत ह्या कार्यक्रमाबद्दल...

मधुरा वेलणकर म्हणतात, आपल्या मातृभाषेचा जन्म कसा झाला, ती कशी वाढली, कशी लढली, कशी आपल्यापर्यंत पोहोचली आणि कशी श्रीमंत झाली, हा सगळा मराठी भाषेचा दोन हजार वर्षांचा रंजक इतिहास, आम्ही नाट्य, संगीत आणि अभिनय अशा करमणुकीच्या माध्यमातून सादर करतो.

या कार्यक्रमाचे 25 हून अधिक प्रयोग झालेआहेत. मा. श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी हा प्रयोग सादर करण्यासाठी आम्हाला राजभवनात निमंत्रित केले व त्यांनी ह्या कार्यक्रमाचे राजभवनात खास आयोजन केले, आणि ‘मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची हि चळवळ आहे. भाषेचा प्रचार आणि प्रसार ह्या दृष्टीनेहेखूप महत्त्वाचं पाऊल आहे, मातृभाषेसाठीचे अनमोल योगदान आहे,’ असे म्हणून या उद्देशासाठी त्यांनी ५ लक्ष रूपयांचा पुरस्कार दिला. तसेच ‘गेटवे ऑफ इंडिया’ ह्या ऐतिहासिक वास्तूवर सादर झालेला हा एकमेव मराठी नाट्यप्रयोग आहे. त्याचबरोबर जबलपूर, पुणे, अनेक महाविद्यालये आणि काळाघोडा महोत्सव इथेसुद्धा याचे प्रयोग झाले. तसंच 25 वा प्रयोग दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांनी ‘महाराष्ट्र सदन दिल्ली’ येथे आयोजित केला होता.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा, परंतु तो का मिळायला हवा हे कळकळीनं सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करमणुकीच्या माध्यमातून काही महत्त्वाचे, अनवट आणि प्रेरणादायी टप्पेसादर करणारा हा कार्यक्रम!

कोणत्याही प्रदेशासाठी भाषा हा अनमोल ठेवा असतो. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात त्या त्या प्रदेशाची भाषा जपणे अतिशय मोलाचेआहे, कारण त्यातून त्या प्रदेशाची संस्कृती, इतिहास आणि अस्मिता जपली जाते. मराठी भाषेच्या महानतेचा नव्याने परिचय होऊन, तिची गोडी निर्माण होईल आणि मातृभाषेत व्यवहार करण्याची प्रेरणा मिळेल या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. मराठीचा हा जागर देशात, परदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पोहोचायला हवा.

कार्यक्रम होत आहे,

 

दिनांक- 30 जून 2024

स्थळ- पुरंदरा भवन, इंदिरानगर संगीतसभा, बेंगळुरू

वेळ- सकाळी 10 वाजता

📍 location : https://maps.app.goo.gl/TGdzETmWzg4SL12p7

Online Booking : 
https://www.ticketalay.com/event-details/madhurav---boru-te-blog/85

आपले पास मिळवण्यासाठी संपर्क करा,

1. मधुरा देव 8600502097

2. अश्विनी कुलकर्णी 9620582442

3. मानसी फडके 9986534197

4. सौरभ फाळके 9916397163

 

मित्रमंडळ बेंगळुरूच्या सदस्यांना, फोन बूकिंग केल्यास पासेस वर सवलत*

 

लवकरच घेऊन येत आहोत वर्षा सहल ... Stay Tuned.

image.png
bottom of page