मंडळाचे अध्यक्ष श्री. शशिकांत काळे ह्यांनी ई _स्मरणिकेचे प्रकाशन केले. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्याला ह्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. भारत आणि चीन संबंध, गलवान खोऱ्याची माहिती, आपल्या सैनिकांनी दाखवलेली गलवान खोऱ्यातील बहादुरी ही आणि अशी बरीच माहिती त्यांनी नकाशाच्या सहाय्याने छान समजावून सांगितली. मंडळाच्या कार्यकर्त्या सौ. मधुरा देव आणि सौ. गंधाली सेवक यांनी ही ई-मुलाखत घेतली होती. प्रेक्षकांकडून आलेल्या सर्वच प्रश्नांची महाजन सरांनी सविस्तर व अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. हि ई-मुलाखत पुन्हा पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्यावी
संध्याकाळी ५ वाजता ई-व्यासपीठ असा मुलांचा स्थानिक कार्यक्रम मंडळांनी Online माध्यमाद्वारे आणला. त्यात लहान मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले अर्थात ऑनलाईनच. चित्रकला, नृत्य, वादन आणि गायन अशा विविध कलांमधून त्यांनी आपली कला सादर केली. हा कार्यक्रम मित्रमंडळाच्या YouTube channel आणि Facebook Page वर उपलब्ध आहे.
संध्याकाळी ६ वाजता, गंधर्व कला केंद्राच्या श्रीमती अर्चना बक्षी व त्यांचे इतर सहकारी मिळून नायक व नायिका भेद हा आगळावेगळा कथक नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाची सांगता अर्चना बक्षी यांच्या दर्जेदार नृत्याविष्काराने झाली. हा कार्यक्रम मित्रमंडळाच्या YouTube channel आणि Facebook Page वर उपलब्ध आहे.
रविवारी २३ ऑगस्ट सकाळी ११ वाजता, स्वरनादच्या बेंगलोर व बेंगलोर बाहेरील कलाकारांनी मिळून 'स्वर आले दुरुनी 'हा मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. ओघवते निवेदन, सुरेल गाणी आणि वाद्यवृंदाची उत्तम साथ यामुळे हा कार्यक्रम बहारदार झाला. हा कार्यक्रम मित्रमंडळाच्या YouTube channel आणि Facebook Page वर उपलब्ध आहे.
संध्याकाळी ४:३० वाजता, जगभरातल्या खवय्यांच्या स्वयंपाक घरात पोहोचलेल्या Madura's recipe च्या शेफ मधुरा बाचल यांच्याशी रविवार दुपारी खमंग बातचीत झाली. सौ. पल्लवी सावंत हिने अतिशय खुमासदार पद्धतीने त्यांची मुलाखत घेतली. ह्या क्षेत्रात त्यांचा प्रवेश, त्यांना आलेले मजेशीर अनुभव, घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना आवडलेल्या रेसिपी अशा अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्या. प्रेक्षकांनी पण खूप उत्साह दाखवला. ह्या गप्पा पून्हा अनुभवण्यासाठी खालील लिंक वर भेट द्या.